COVID-19 New Guidelines by MHA: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी; 1 डिसेंबर पासून लागू होणार नवे नियम
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स कोरोना व्हायरस नियंत्रण, संसर्ग आणि काळजी या संदर्भात आहेत. 1 डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार असून 31 डिसेंबरपर्यंत याचा अंमल  राहणार आहे. विशेषत: हे नियम कंटेनमेंट झोनसाठी (Containment Zones) लागू करण्यात आले आहेत. (Coronavirus In Maharashtra: राजस्थान, गोवा, दिल्ली व गुजरात मधून महाराष्ट्रात येणार्‍यांसाठी आजपासून RT-PCR test बंधनकारक)

कन्टेमेंट झोन भोवती कडक सुरक्षा व्यवस्था असावी जेणेकरुन वैद्यकीय कर्मचारी किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीची या परिसरातून ये-जा होऊ नये. नेमून दिलेल्या पाहाणी कक्षाने प्रत्येक घराची वेळोवेळी पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाचे त्वरित आयसोलेशन करुन कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात यावे. असे गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे.

कन्टेंमेट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी द्यावी, याची काळजी राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज असेल त्या ठिकाणी अधिक निर्बंध लावण्याचे अधिक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. राज्याअंतर्गत होणाऱ्या व्यक्तीच्या आणि मालाच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

ANI Tweet:

कन्टेंमेट झोन वगळता इतर सर्व भागांत सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. फक्त खालील गोष्टींसाठी निर्बंध लागू केले आहेत.

# आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणारे प्रवासी.

# सिनेमा हॉल आणि थिएटर्स 50% क्षमतेवर चालवावेत.

# स्विमिंग पूलचा वापर केवळ खेळाडूंच्या ट्रेनिंगसाठी करावा.

# Exhibition halls केवळ व्यावसायासाठी करावा.

# लग्न समारंभ किंवा इतर सभारंभासाठी केवळ 200 माणसांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 9222217 वर पोहचला आहे. त्यापैकी 8642771 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 134699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 444746 सक्रीय रुग्ण आहेत.