Coronavirus Vaccination: देशात कोरोनासह त्याच्या नव्या वेरियंटच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याचे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली आहे. सध्या देशात 15 ते 17 वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. दरम्यान, आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे, जिथे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे अध्यक्ष डॉ एनके अरोरा यांनी सांगितले आहे की 12-14 मार्चपासून ही लस सुद्धा मिळणे सुरू होईल. आत्तापर्यंत देशातील 15-17 वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
आतापर्यंत, सुमारे 45% मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताने अवघ्या 13 दिवसांत हा टप्पा गाठला आहे. भारतात 15-17 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण प्रक्रिया 3 जानेवारीपासून सुरू झाली आहे. डॉ. अरोरा म्हणाले, 'जानेवारी अखेरीस 15-17 वर्षे वयोगटातील 7.4 कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळेल.'(Coronavirus India Updates: भारतातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 15.50 लाखांवर, पाठीमागील 24 तासात 2.71 जणांना संसर्ग)
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आम्ही या मुलांना दुसरा डोस देण्यास सुरुवात करू आणि महिन्याच्या अखेरीस प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस मिळेल. त्यानंतर आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना लस देणे सुरू करू शकतो. ज्यामध्ये पाच मतदान राज्यांमध्ये नियुक्त केलेले मतदान कर्मचारी आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे.
देशातील लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशात 156 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना लस देऊन लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. या एका वर्षात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागली. लसीकरणाबाबत लोकांना जागरुक करणे हे एक मोठे आव्हान असताना दुसरीकडे त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.