Coronavirus: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तसेच काहीही झाले तरीही नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे ही त्यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही नागरिक विनाकारण गर्दी करत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाउन 21 दिवसांचा जरी असला तरीही अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा आता 918 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशावर आलेले महाभयंकर संटक दूर करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सरकारकडून सुद्धा विविध नियमांची अंमलबजावणी करत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच प्रयत्न केला जात आहे. तरीही कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला आहे. तर 80 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 जणांचा आतापर्यंत देशात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.(तामिळनाडू: कोरोना व्हायरसप्रमाणे दिसणारे हेल्मेट घालून चेन्नईतील पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केलं घराबाहेर न पडण्याचं आवाहन; पहा फोटो) 

राज्यात कोरोना व्हायरसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या 6 पैकी 4 जण हे मुंबईतील असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर देशातील डॉक्टर्स रात्रंदिवस काम करत आहेत. तसेच पोलिस ही रस्त्यांवर गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडे कोरोनाचा सामना करण्याची उत्तम सोय आहे. मात्र त्यात जर त्यांना अधिक मदत हवी असेल तर नौदल सज्ज असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.