Narendra Singh Tomar | (Photo Credit: ANI/Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाशी अवघा देश लढत आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन (Lockdown) यशस्वी व्हावा यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे अवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याला देशभरातूनही प्रतिसाद मिळत आहे. असे असताना पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातीलच एका मंत्र्याने सोशल डिस्टंन्सीग धाब्यावर बसवले आहे. नरेंद्र सिंह तोमर ( Narendra Singh Tomar) असे या मंत्र्याचे नाव आहे.

घटना मध्य प्रदेश राज्यातील श्योपूर जिल्ह्यातील आहे. श्योपूर जिल्ह्यातील रेस्ट हाऊस येथे नरेंद्र सिंह तोमर उपस्थित झाले. या वेळी भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थि झाले. ही उपस्थिती इतकी मोठी होती की या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी झाली. ज्यामुळे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन तर झालेच. पण, सोशल डिस्टंन्सीग सुद्धा पाळले गेले नाही. सोशल डिस्टंन्सींगचा पूरता फज्जा उडाला. (हेही वाचा, सरकारमध्ये असून निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर, काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे- राधाकृष्ण विखे पाटील)

एएनआय ट्विट

विशेष म्हणजे इतकी सगळी गर्दी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या समोर जमली होती. नरेंद्र सिंह तोमर हे निषादराज भवन येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. इथे कोरोना योध्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपायजोजनांचा आढावाही घेतला.