Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus Outbreak: जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरने आता भारतामध्येही आपली दहशत पसरवण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सुमारे 73 कोरोना बाधित रूग्ण आहेत. आज (12 मार्च) सकाळी 11 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार देशभरात 56 भारतीय आणि 17 परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. देशात निदान करण्यात आलेल्या सार्‍या रूग्णांवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सुदैवाने अद्याप भारतात एकही कोरोनाचा बळी गेलेला नाही. मात्र सर्वाधिक रूग्ण भारतामध्ये केरळ राज्यात आहेत. केरळमध्ये रूग्णांचा आकडा 17वर पोहचला असून या आजाराची गंभीरता लक्षात घेता 31 मार्च पर्यंत काही भागातील शाळा, परीक्षा रद्द करण्यात आली आहेत. सोबतच सिनेमागृहं देखील 31 मार्च पर्यंत बंद ठेवली जातील असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

WHO या आरोग्य संघटनेदेखील कोरोनाची वाढती भीती पाहता त्याला जागतिक आरोग्य म्हणून घोषीत केले आहे. दरम्यान त्यानंतर भारताने 15 एप्रिल पर्यंत परदेशातून येणार्‍या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला आहे. तर अमेरिकेमध्येही 30 मार्चपर्यंत युरोपातून येणार्‍या प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे. Coronavirus: COVID-19 विषाणू म्हणजे साथीचा आजार- जागतिक आरोग्य संघटना.

ANI Tweet

कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहान प्रांतातून जगभर पसरला आहे. डिसेंबर 2019 मध्ये काहींनी खाल्लेल्या रानटी प्राण्याच्या मांसातून हा विषाणू पसरला आहे. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण 1 ते 3% आहे. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा दक्ष राहून या आजाराचा सामना करण्याचं आवाहन आरोग्य संस्थांकडून करण्यात आलं आहे.