Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या दुष्टचक्रात भारत देश अधिकाधिक अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आजही त्यात वाढ झाली असून भारताने 35000 चा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत 1993 नव्या रुग्णांची भर पडली असून 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 35043 इतकी झाली असून मृतांचा आकडा 1147 वर पोहचाला आहे. आतापर्यंत 8889 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही 25007 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

35 हजारांपैकी 10 हजार रुग्ण केवळ महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच कोरोनाग्रस्तांच्या यादीत अग्रस्थानी होते. आता महाराष्ट्राने 10000 चां टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. (Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एका क्लिकवर)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसची वाढती साखळी तोडण्यासाठी भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र त्या काळातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला. यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा वेग मंदावला असला तरी रुग्णसंख्येत भर पडत आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनही दोन दिवसांनी संपणार असून पुढे काय होणार, हा प्रश्न देशवासियांच्या मनात आहे.