Coronavirus | Representational, Edited Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना बाधितांनी 35000 चा टप्पा पार केला असून त्यापैकी 10000 हून अधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणित वाढत आहे. तर काही जिल्हे कोरोनामुक्त झाल्याचे सकारात्मक चित्र देखील समोर आहे. सध्या महाराष्ट्रात 10493 कोरोना बाधित रुग्ण असून 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1773 रुग्ण कोरोना संसर्गात पूर्णपणे रिकव्हर झाले असून 8266 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण तर मृत्यूचे प्रमाण किती जाणून घेऊया.

कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 30 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. (Lockdown: मुंबई, पुणे नंतर लॉकडाऊन काळात सर्वात टेन्शनमध्ये कोण? पाहा काय सांगतोय TRA रिसर्च)

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 7061 290
2 ठाणे 48 2
3 ठाणे मनपा 412 6
4 नवी मुंबई मनपा 174 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 153 3
6 उल्हासनगर मनपा 3 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 17 0
8 मीरा भाईंदर 126 2
9 पालघर 41 1
10 वसई विरार मनपा 128 3
11 रायगड 24 1
12 पनवेल मनपा 47 2
ठाणे मंडळ एकूण 8244 313
1 नाशिक 6 0
1 नाशिक मनपा 20 0
3 मालेगाव मनपा 171 12
4 अहमदनगर 26 2
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 17 1
8 जळगाव 30 8
9 जळगाव मनपा 10 1
10 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 315 27
1 पुणे 63 3
2 पुणे मनपा 1113 82
3 पिंपरी-चिंचवड मनपा 72 3
4 सोलापूर 7 0
5 सोलापूर मनपा 92 6
6 सातारा 32 2
पुणे मंडळ एकूण 1379 96
1 कोल्हापूर 9 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 28 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 2 0
6 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकूण 53 2
औरंगाबाद 2 0
2 औरंगाबाद मनपा 129 7
3 जालना 2 0
4 हिंगोली 15 0
5 परभणी 0 0
परभणी मनपा 2 0
औरंगाबाद मंडळ एकूण 150 7
1 लातूर 12 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 3 0
लातूर मंडळ एकूण 19 1
1 अकोला 12 1
2 अकोला मनपा 27 0
3 अमरावती 2 0
4 अमवरावती मनपा 26 7
5 यवतमाळ 79 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 2 0
अकोला मंडळ एकूण 169 9
1 नागपूर 6 0
2 नागपूर मनपा 133 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 143 2
1 इतर राज्य 26 2
एकूण 10498 459

भारताने 35000 चा टप्पा पार केला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 35043 इतकी झाली असून मृतांचा आकडा 1147 वर पोहचाला आहे. आतापर्यंत 8889 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे अजूनही 25007 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.