Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारत देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसचे 909 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 34 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोना बाधित नागरिकांची संख्या 8356 इतकी झाली आहे. यापैकी 716 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 273 नागरिकांचा कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या भारत देशात झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिसा, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला होता. या यादीत आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. (दिवसभरातील ताज्या बातम्या, लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, राज्यस्थान या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. इतर राज्यांमधील आकडेवारी पहा- मध्यप्रदेश 532, जम्मू काश्मीर 207, पंजाब 151, पश्चिम बंगाल 134, गुजरात 432, हरियाणा 117, बिहार 63, चंदीगड 19, आसाम 29, लडाख 15, अंदमान-निकोबार 11, उत्तराखंड 35, अरुणाचल प्रदेश 1, गोवा 7, छत्तीसगड 18, हिमाचल प्रदेश 32, झारखंड 17, मणिपूर 2, ओडिसा 50, पांडिचेरी 7.

ANI Tweet:

इटली, स्पेन पाठोपाठ अमेरिकेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मात्र धोक्याची घंटा वेळीच लक्षात घेत लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने भारत देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काळात कोरोनाचा फैलाव कितपत वाढतो? का लांबवलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात येते? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.