भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रिमतांसोबतच ओमायक्रोन (Omicron) संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात पाठीमागील 24 तासात 27,553 जण कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही संख्या 21% नी वाढली आहे. सोबतच देशात सक्रीय रुग्णांच्या (Coronavirus, Omicron Updates In India) संख्येतही अचानक वाढ झाली आहे. देशातील सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 0.35% आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात पाठीमागील 24 तासात 9,249 लोक वैद्यकीय उपचार घेऊन बरे झाले आहेत. जे आगोदर कोरोना व्हायरस संक्रमित होते. देशातील उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 3,42,84,561 इतकी झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा बरे (रिकव्हरी रेट) होण्याचे प्रमाण 98.27% आहे.
देशात पाठिमागील 24 तासात दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट वाढून 2.55% वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर 1.35% पर्यंत पोहोचला आहे. त्यासोबतच देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा शोध घेण्यासाठी 68 कोटी रुपयांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात 24 तासात 284 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. (हेही वाचा, Coronavirus Updates In India: केंद्राचा अलर्ट, तिसरी लाट येण्यापूर्वी पावले उचला; महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगालसह आठ राज्यांना पत्र)
COVID19 | India reports 27,553 fresh infections, 284 deaths and 9,249 discharges in the last 24 hours; Active caseload stands at 1,22,801
Omicron case tally rises to 1,525 pic.twitter.com/KH605GBwDA
— ANI (@ANI) January 2, 2022
पाठिमागील 5 दिवसांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत वारंवार वाढ होताना दिसत आहे. 28 डिसेंबरला देशात कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत 9,195 प्रकरणे पुढे आली होती. त्यानंतर 29 डिसेंबरला 13,154, 30 डिसेंबरला 16,764, 31 डिसेंबरला 22,775 आणि नववर्षाक एक डिसेंबरला 27,553 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले. देशातील लसीकरणाची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात आतापर्यंत 145.44 कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.