सर्व काही निवळेल अशी आशा असतानाच कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. देशभरातील विविध राज्यांमधून येणारे कोरोनाचे आकडे पाहता राज्यांसोबतच केंद्र सरकारही सावध झाले आहे. केंद्र सरकारने देशभरातील सुमारे आठ राज्यांना पत्र लिहून सावधगिरीचा इशारा (Coronavirus Updates In India) दिला आहे. काळाची पावले ओळखून तिसरी लाट येण्यापूर्वीच योग्य पावले उचला. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवणार नाही, असा इशारा या पत्रात दिला आहे. केंद्राने ज्या राज्यांना पत्र पाठवले आहे त्यात महाराष्ट्रासह (Maharashtra), दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल (West Bengal), गुजरात (Gujarat), कर्नाटक (Karnataka) आणि झारखंड राज्यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या आठ राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमन नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत असा सल्ला देण्यात आला आहे. या शिवाय कोरोना नियंत्रणासाठी चाचणी आणि लसीकरण यांचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. देशात ज्ञात असलेल्या एकूण कोरोना संक्रमितांपैकै ओमायक्रोन या स्ट्रेनचे 961 रुग्ण आढळले आहेत. संक्रमितांची आकडेवारी कमी असतानाच 29 डिसेंबर रोजी देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण 44% नी वाढताना दिसले. ओमायक्रोनमुळेच ही रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे, असे निरीक्षण तज्ज्ञ नोंदवत आहेत. (हेही वाचा, Coronavirus Updates In Mumbai: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत अवघ्या 24 तासात 3671 जणांना कोरोना संसर्ग; सावध ऐका पुढच्या हाका, धोक्याची घंटा वाजतेय)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार (30 डिसेंबर सकाळी) पाठिमागील चोविस तासात देशभरात कोरोना व्हायरस संक्रमित 13,154 रुग्णांची नोंद झाली. तर 268 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस बीकट होत असलेली स्थिती पाहता महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील सरकारांनी रात्रीची जमावबंदी लागू करत सावधगिरीचे पाऊल टाकले आहे. वेळप्रसंगी निर्बंध अधिक कठोर करण्याबाबतही राज्य सरकारांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागणार अशी चिन्हे आहेत.
दरम्यान, पाठिमागील 24 तासात मुंबईत (Mumbai) तब्बल 3671 जणांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. ही आकडेवारी आज (गुरुवार, 30 जानेवारी) सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. दरम्यान, पाठिमागील 24 तासात कोरोनावरील उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या केवळ 371 इतकी आहे, मुंबई महापालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमितांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 77749159 इतकी झाली आहे. उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचा सरासरी वेग हा 96% इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 11360 इतकी आहे. कोरोना रुग्णवाढीच्या दुप्पटीचा सरासरी दर हा 505 दिवसांवर पोहोचला आहे. कोविड वढीचे सरासरी प्रमाण 0.14% इतके झाले आहे. मुंबई शहरात आतापर्यंत 16375 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.