
देशात वाढता कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पाहता येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मात्र 3 मे नंतर रेल्वे किंवा विमान सेवा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. कारण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत असे म्हटले आहे की, आरोग्य विभागासोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तर रेल्वे सुरु केल्यास सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे फार मुश्किल आहे. तसेच एअर इंडिया (Air India) आणि अन्य खासगी विमानसेवा कंपन्यांनी 3 मे नंतर तिकिट बुकिंग सुरु करणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी असे म्हटले आहे की, विमान सेवा सध्या सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे व्यर्थ आहे. तर रेल्वे सेवा एक ना एक दिवस पुन्हा सुरु होणारच आहे. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रेल्वे सेवेसंबंधित निर्णय आता घेतला जाणार नाही. दरम्यान, सरकारने कोरोनाच्या विरोधात लढण्याासाठी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले होते. मात्र आता पुन्हा लॉकडाउनचे आदेश मे 3 पर्यंत कायम राहणार आहेत. या वेळी देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा, रेल्वे किंवा विमान उड्डाणांवर बंदी असणार आहे. लॉक डाऊननंतर विमान सेवा सुरु? Flight Operations बाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे उड्डाण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
काही विमान कंपन्यांनी 4 मे पासून देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. यावर नागर विमान मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी असे म्हटले की, विमानसेवांना असा सल्ला दिला जात आहे की, आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत विमान सेवा सुरु करण्यासंबंधित सरकारचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्यानंतरच तिकिट बुकिंग सेवा सुरु करण्यात यावी.