महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश कायम ठेवले आहेत. मात्र केंद्र सरकारने शनिवारी नवी मार्गदर्शक सुचनांबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार काही गोष्टी विविध राज्यात सुरु होणार आहेत. मात्र कोरोनाच्या हॉटस्पॉट आणि कन्टेंटमेंट झोनसाठी हा नियम लागू नसणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच गोवा (Goa) हे कोरोनामुक्त राज्य घोषित करण्यात आले. त्यानंतर गोव्याच्या स्थानिक सरकारने तेथील उद्योगधंद्यांबाबत एक नोटिस काढली होती. त्यानंतर आता गोव्यात कसिनो, स्पा आणि मसाज पार्लर, नाईट क्लबसह अन्य काही गोष्टी पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नसल्याच्या निर्णय गोवा सरकारने जाहीर केला आहे.
गोव्यात सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही आहे. मात्र तरीही तेथील काही गोष्टी सुरु करण्यात आलेल्या नाहीत. याच पार्श्वभुमीवर आता गोवा सरकारने अजून एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात जिमखाने, सिनेमागृह, सार्वजनिक जलतरण तलाव, स्टँड अलोन आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादि गोष्टी बंद राहणार आहेत. तसेच रिसॉर्ट्स, स्पा आणि मसाज पार्लर, नाईट क्लब आणि मल्टिप्लेक्स ही पूर्णपणे बंद राहणार आहेत.(Coronavirus Lockdown: गोवा मच्छीमारांना लॉकडाउनच्या काळात मासे विक्री करण्यासंदर्भात अॅडव्हायजरी जारी)
Goa Government issues order to all the gymnasiums, cinema theatres, public swimming pools, both stand alone and in hotels,resorts etc. Casinos, spa & massage parlours/salons, river cruises, night clubs & multiplexes to remain shut till further orders. #COVID19 pic.twitter.com/OrP4E4xPza
— ANI (@ANI) April 25, 2020
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 24506 रुग्ण आढळून आले आहेत. तर 775 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र 3 मे नंतर लॉकडाउनच्या आदेशासंदर्भात केंद्र सरकार लवकरच निर्णय जाहीर करु शकते. त्याचसोबत देशभरात कोरोनाबाधितांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह डॉक्टर्स सर्वोतोपरी उपचार करत आहेत. तर आता प्लाझ्मा थेरपीचा वापर कोरोनाबाधितांवर केला जात आहे.