Coronavirus: सोशल मीडियावर 'करोना व्हायरस'बाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अभियंत्यास इन्फोसिस कंपनीने हटवले
File image of Infosys | (Photo Credits: PTI)

माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रातील नामांकीत इन्फोसिस (Infosys) कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्यास नोकरीवरुन काढून टाकले आहे. मुजीब मोहम्मद असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी इन्फोसिस कंपनीत अभियंता होता. या अभियंत्याने सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या अभियंत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'आमच्या सोबत या. लोकांमध्ये जाऊन शिंका. व्हायरस पसरवा'. त्याच्या पोस्टवर आक्षेप घेत कंपनीने कारवाई करत त्याला नोकरीवरुन काढून टाकले. सोशल मीडियावरची त्याची पोस्ट व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केल्याचेही वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

इन्फोसिस कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, आम्ही कर्मचाऱ्याची चौकशी केली आहे. आम्हाला वाटते की, त्याने एक चुकीच्या ओळखीचे प्रकरण नाही. कर्मचाऱ्याची पोस्ट कंपनी नियम आणि सामाजिक जबाबदारीच्या विरोधात आहे. अशा प्रकरणांबाबत आमची झीरो टॉलरेंस पॉलीसी आहे. त्यामुळे आम्ही त्याला नोकरीवरुन काढले आहे.' (हेही वाचा, बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर)

ट्विट

टविट

काही दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या बंगळुरु कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित आढळला होता. त्यानंतर कंपनीने संपूर्ण कार्यालय खाली केले होते. तसेच, संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले होते. बंगळुरु येथे इन्फोसिस कंपनीची 10 पेक्षा अधिक कार्यालयं आहेत. या कार्यालयांतून डेवलपमेंट सेंटर आणि कॉर्पोरेट सेंटर ऑपरेट होतात. कोरोना संक्रमण पाहता इन्फोसिसने कर्मऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा दिली आहे. सोबतच कंपनीने भारत आणि इतर देशांमध्येही कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि त्या त्या देशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे अश्वासन दिले आहे.