चीन मधील वुहान (Wuhan) शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरमुळे (Coronavirus) मृतांचा आकडा 600 पेक्षा अधिक वाढला आहे. तर या शहरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास सुद्धा परवानगी नाही आहे. कोरोनामुळे संक्रामित झालेली नवी 37 हजार प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे चीन मध्ये कोरोना व्हायरसचा धोका कमी होण्याची लक्षण दिसून येत नाही आहेत. कोरोना व्हायरसचा धोका चीनसह अन्य 25 देशांना असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारत 17 वा क्रमांकावर असून दिल्ली विमानतळावर याच्या इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. बर्लिन येथे हम्बोल्ट युनिव्हर्सिटी आणि रॉबर कोच संस्थेचे संशोधक यांनी एका अभ्यासानुसार 30 देशातल्या सुचीमध्ये भारत 17 व्या स्थानावर असल्याचे सांगितले आहे.
बर्लिन येथे हम्बोल्ट युनिव्हर्सिटी आणि रॉबर कोच संस्थेचे संशोधकांनी एक मॉडेल तयार केले असून त्यानुसार एअरपोर्ट ट्रान्सपोर्टेशन पॅटर्नचे विश्लेषण करणार आहेत. त्यामध्ये चीन सोडून अन्य कोणत्या देशांना याची लागण झाली आहे याचा शोध घेण्यास मदत होणार आहे. या मॉडेलमुळे थायलंड, जपान आणि साऊथ कोरिया येथे कोरोनामुळे सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे.(कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 800 हून अधिक जणांचा मृत्यू, WHO चीनमध्ये पाठवणार विशेष पथक)
रिपोर्टनुसार, भारतातील दिल्ली विमानतळावर कोरोना व्हारसचे संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यानंतर मुंबई आणि कोलकाता यांचा क्रमांक लागतो. आतापर्यंत तीन भारतीय नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या लोकांना 28 दिवसांसाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.