Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे नसले तरी, वाढत्या COVID-19 रुग्णांची संख्या विचारात घेता प्रवाशांनी ते स्वत:हून वापरावेत. आतापर्यंत, फ्लाइटमध्ये प्रवास करताना मास्क किंवा फेस कव्हर वापरणे अनिवार्य होते. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) बुधवारी (16 नोव्हेंबर) ही माहिती दिली.

नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने नियोजित एअरलाइन्सला दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, कोविड -19 व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून सरकारी धोरणाच्या अनुषंगाने नवा निरणय घेण्यात आलाा आहे. या निर्णयानुसार विमानांमध्ये होणाऱ्या उद्घोषणांमध्ये यापुढे 'कोविड-19 मुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, सर्व प्रवाशांनी शक्यतो मास्क/फेस कव्हर वापरावे'. (हेही वाचा, Bappi Lahiri यांच्या ‘Jimmy, Jimmy’ गाणं वापरून चीनी नागरिक करत आहेत कठोर COVID-19 Lockdown निर्बंधांचा निषेध (Watch Video))

सरकारने विमान कंपन्यांना दिलेल्या माहितीमध्ये असेही म्हटले आहे की, फ्लाइटमधील घोषणांचा भाग म्हणून दंड/दंडात्मक कारवाईचा कोणताही विशिष्ट संदर्भ जाहीर करणे आवश्यक नाही. सरकारने पुढे अवाहन केले आहे की, हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे नसले तरी, वाढत्या COVID-19 रुग्णांची संख्या विचारात घेता प्रवाशांनी ते स्वत:हून वापरावेत. आतापर्यंत, फ्लाइटमध्ये प्रवास करताना मास्क किंवा फेस कव्हर वापरणे अनिवार्य होते.

ट्विट

सरकारी माहिती आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाव्हायरस प्रकरणांची देशातील एकूण सक्रिय संख्या एकूण संक्रमणांपैकी केवळ 0.02 टक्के होती. ताज्या आणि अधिकृत आकडेवारीनुसार पुनर्प्राप्तीचा दर 98.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,28,580 वर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे.