Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1,58,333 वर; मागील 24 तासांत 6,566 नवे रुग्ण
Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली आहे. मागील 24 तासांत देशात 6,566 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील कोरोना बाधितांची संख्या 1,58,333 इतकी झाली आहे. त्यापैकी 67692 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 86110 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोना संसर्गामुळे बळींचा आकडा 4531 वर पोहचला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली असली तरी कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही. देशातील विविध राज्यांच्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात या ठिकाणी कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठा आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथेही कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना व्हायरस रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. (महाराष्ट्रात एकूण 56 हजार 948 कोरोनाबाधित; राज्यात दिवसभरात 2 हजार 190 रुग्णांची नोंद तर, 105 जणांचा मृत्यू)

ANI Tweet:

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा सध्या चौथा टप्पा संपूर्ण देशात सुरु आहे. काही अवघ्या 2-3 दिवसांत लॉकडाऊन संपेल. त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न जनतेच्या मनांत आहे. दरम्यान लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नाही तर टप्पाटप्प्याने त्यात शिथिलता आणण्यात येईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.