Coronavirus: महाराष्ट्रात एकूण 56 हजार 948 कोरोनाबाधित; राज्यात दिवसभरात 2 हजार 190 रुग्णांची नोंद तर, 105 जणांचा मृत्यू
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 190 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 1 लाख 51 हजार 767 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 4 हजार 337 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 64 हजार 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील 1964 पोलिस कोरोना व्हायरसच्या विळख्यात; मागील 24 तासांत 75 नव्या कोरोनाग्रस्त पोलिसांची भर

राजेश टोपे यांचे ट्वीट-

राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 32, ठाण्यात16, जळगाव 10, पुण्यात 9 ,नवी मुंबई 7, रायगड 7, अकोल्यात 7, औरंगाबाद 4, नाशिक 3, सोलापूरात 3, सातारा 2, अहमदनगर 1, नागपूर 1, नंदूरबार 1, पनवेल 1 तर वसई एकाचा मृत्यू झाला आहे.