जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान भारतात सुरु आहे. दर दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना बाधितांची संख्या 12,881 ने वाढली आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा 3.6 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही दिलासादायक आहे. देशात आतापर्यंत तब्बल 1,94,324 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी (18 जून) भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 52.95% इतका आहे. तर रिकव्हरी आणि मृत्यू दर याचा रेशो 94.07%:5.93% इतका आहे. (भारतामध्ये COVID-19 बाधितांची संख्या 3,66,946 वर; 24 तासांत सर्वाधिक 12,881 नवे रूग्ण तर 334 जणांचा मृत्यू)
बुधवारी (17 जून) देशातील रिकव्हरी रेट 52.47% इतका होता. तर 16 जून रोजी हा रेट 51.08% इतका होता. तर मागील काही दिवसांतील रिकव्हरी रेटवर नजर टाकली असता दिवसेंदिवस रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. 10 जून रोजी रिकव्हरी रेट 48.88% इतका होता. मागील 8 दिवसांत त्यात सुधारणा होत आजचा रिकव्हरी रेट 52.95% इतका आहे.
ANI Tweet:
The recovery rate has further improved to 52.95%; the recoveries/deaths ratio stands at 94.07%:5.93%: Government of India. #COVID19 pic.twitter.com/0CQtHPioUS
— ANI (@ANI) June 18, 2020
देशातील कोरोना बाधितांची संख्या 366946 इतकी झाली असून 194325 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 160384 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात 12237 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्यात 1,16,752 कोरोनाग्रस्त असून 5,651 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसंच दिवसागणित भर पडणाऱ्या नव्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.