Coronavirus (Photo Credits: Twitter)

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. आजही त्यात मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत 69,652 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 977 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,86,395 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 20,96,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान देशातील मृतांचा आकडा 53,866 इतका झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.

कोविड-19 चा वाढता संसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला बहुतांश प्रमाणात यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असून रिकव्हरी रेटही सुधारत आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 9 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

देशात  महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. दरम्यान देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तरी देखील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे गाफील न राहता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.