प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात कोरोना व्हायरसचे थैमान पाहता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मोदी यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळायची असल्यास नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक आहेच. पण तुम्ही पुढील 21 दिवस घराबाहेर पडू शकत नाही असे म्हणत लॉकडाउन येत्या 14 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधाच फक्त नागरिकांना मिळणार असून अन्य गोष्टी पूर्णपणे बंद राहणार आहेत. याच पार्श्वभुमीवर भारत देशाची जनगणना दर दहा वर्षाने होत असल्याने यंदाची पहिल्या टप्प्यातील जनगणना ठरवलेल्या काळापासून होणार नाही आहे. तसेच एनपीआरसाठीचे काम सुद्धा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याबबातची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

सरकारी योजनेनुसार एनपीआरचे काम येत्या 1 एप्रिल पासून सुरु होऊन 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. तसेच जनगणना आणि एनपीआरसाठी 80 लाख फिल्ड फंक्शनरिज यांचे ट्रेनिंग सुद्धा सुरु करण्यात आले होत. मात्र कोरोना व्हायरसची देशातील परिस्थिती पाहता बहुतांश केंद्र सुरु करण्यात आले होते. पण आता ही केंद्रे पुन्हा कधी सुरु होणार हे अस्पष्ट आहे. कोरोना व्हायरसमुळे एनपीआर आणि जनजणनासंबंधितच्या 3 कोटी फॉर्म छपाईवर परिणाम झाला आहे.

तसेच दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेचे काम 2 ते 28 फेब्रुवारी 2021 आणि त्याच्या रिव्हिजनचे काम 1 ते 5 मार्च पर्यंत करण्यात येणार होते. केंद्र सरकारने या कामासाठी 8754 रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने असे म्हटले होते की, जनगणना 2021 आणि एनपीआर अपडेट करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहे. तसेच उच्च स्तरिय बैठका सुद्धा घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले होतेय मात्र आता देशातील स्थिती पाहता एनपीआर आणि जनगणनेचे कार्य पुढील आदेशापर्यंत स्थिगत करण्यात आले आहे.