भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 4421 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 354 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3981 इतकी आहे. आतापर्यंत 325 नागरिकांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 114 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण ( Ministry of Health and Family Welfare) मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, केवळ भारतच नव्हे तर जगभरातील इतर देशांमध्येही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या देशांमध्ये केवळ कोरोना रुग्णांची संख्याच वाढत नाही. तर, त्या देशांमधील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही प्रचंड आहे. ताच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे 8911 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क येथे कोरोना व्हायरसमुळे आणखी 599 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस बाधितांचा हा मृत्यूदर पाहता अद्यापही भारतामध्ये स्थिती फारच उत्तम आहे. (हेही वाचा,Coronavirus: इंग्लंडचे पंतप्रधान Boris Johnson यांनाही कोरोना व्हायरस लागण, अतिदक्षता विभागात उपचार सुरु; परराष्ट्र मंत्री डोमिनिक सांभाळतातय कारभाराची सूत्रं )
एएनआय ट्विट
Increase of 354 #COVID19 cases, 5 deaths in last 24 hours; India's positive cases rise to 4421 (including 3981 active cases, 325 cured/discharged/migrated people and 114 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/OotvtHN18H
— ANI (@ANI) April 7, 2020
देशासोबत महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काल (6 एप्रिल 2020) सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 868 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 52 कोरोना बाधित व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे.