भारतीय लष्करातील एका जवानाला (Army Soldier) कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण झाले. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. रुग्णलयात उपचार सुरु असतानाच त्याने आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त सिंडिकेट या वृत्तवाहिनीने दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जवानास फुफ्फुसाचा कर्करोगही होता.
पोलिसांनी पुढे सांगितले की, या जवानाची कोरोना व्हायरस चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली होती. या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मिळाली. (हेही वाचा,Air India च्या कर्मचार्याला कोरोना विषाणूची लागण; दिल्ली येथील मुख्यालय केले सील )
पलीस उपायुक्त दीपक पुरोहित यांनी सांगितले की, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जवानाचा मृतदेह कोविड 19 वॉर्डच्या पाठीमागे असलेल्या झाडाला नायलॉनच्या दोरीने लटकताना दिसला. घटनास्थळावर कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवानाचे कुटुंबीय राजस्थान येथील अलवार जिल्ह्यात राहतात. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.