सावधान! भारतात आढळून आला कोरोना व्हायरस चा संशयित रुग्ण; चीनहून आलेला विद्यार्थी या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची शक्यता
Coronavirus

चीनमध्ये आलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवसेंदिवस भीषण होत चालल्याचा दिसत आहे. या व्हायरस ने अमेरिकेसह आतापर्यंत 12 देशांना घेरले आहे. त्यामुळे या व्हायरस लोण आता हळूहळू भारतातही पसरण्याची शक्यता दिसत आहे. कारण जयपूरमध्ये कोरोना व्हायरस ग्रस्त एक तरुण आढळून आला आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण चीनहून परत आलेला विदयार्थी आहे. जयपूरमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचा हा रुग्ण आढळला. अधिक उपचारासाठी त्याला जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या सरकारी रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयित रुग्ण हा चीनमध्ये शिकण्यासाठी गेला होता. तो भारतात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लक्षण दिसल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर तिकडे चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे.

हेदेखील वाचा- कोरोना व्हायरस म्हणजे नेमके काय? लक्षणे आणि खबरदारीचे उपाय घ्या जाणून

राजस्थानचे वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सवाई मान सिंह (एसएमएस) मेडिकल कॉलेज प्रशासनाला सांगितले की, एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी चीनहून परत आल्यावर रुग्णाला ताबडतोब कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय आला आणि त्यांनी एका विशेष वॉर्डमध्ये(आयसोलेशन) ठेवले आणि संपूर्ण कुटुंबाला स्क्रिनिंगसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये (China) कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मागील महिनाभरापासून दहशत पसरली आहे. तर या व्हायरसची लागण झाल्याची 1975 प्रकरणे समोर आली असून मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा 56 वर पोहचला आहे.