राजधानी दिल्ली (Delhi) येथे मोहल्ला क्लिनिक (Mohalla Clinic) चालवणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे 12 ते 18 मार्च या कालावधीत या क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या नागरिकांनी स्वत:च्या घरातच स्वत:ला होम क्वारंटाइन करावे, असे अवाहन केजरीवाल सरकारने भिंतवर लावलेल्या एका नोटीशीत करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. देशातील आणि राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची सख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये
''आपणा सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, डॉ. गोपाल झा मोहल्ला क्लिनिक, मोहनपुरी, मौजपूर, दिल्ली COVID-19 (कोरोना व्हायरस) संक्रमीत झाले आहे. त्यामुळे 12 ते 18 मार्च या कालावधीत या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी पुढील 15 दिवस स्वत:ला स्वत:च्याच घरात होम क्वारंटाइन करावे. या काळात जर कोणाला कोरोना व्हायरस लक्षणे दिसल्यास त्वरतीत प्रशासनाशी अथवा आरोग्य विभागाशी संपर्क करण्यात यावा.'' (हेही वाचा, Coronavirus: डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ यांना घराबाहेर काढणाऱ्या घरमालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशन)
ट्विट
ज़रूरी सूचना ! pic.twitter.com/TkkRSLCvBo
— Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) March 25, 2020
दरम्यान, या क्लिनिकमध्ये उपचासाठी आलेल्या सुमारे 1000 रुग्णांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मोहोल्ला क्लिनिकमध्ये उपचारासाठी दिवसभरात सुमारे 150 ते 200 रुग्ण येत असतात. त्यामुळे 12 ते 18 मार्च असा कालावधी पकडला तर, सुमारे 1000 नागरिकांनी या काळात उपचार घेतले. यात एक रविवार आला आहे. तो सुट्टीचा दिवस असल्याने या कालावधीतून वगळण्यात आला आहे.