Coronavirus: गुजरात येथे 52 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. मात्र यापूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. तसेच आता कोरोनाबाधितांचा आकडा भारतात 1800 च्या पार आणि मृतांचा आकडा 53 वर पोहचला आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब असून सरकारकडून वेळोवेळी योग्य ती पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. ऐवढेच नाही तर मृतांचा आकड्यात ही वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, गुजरात येथील एका 52 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती ही श्रीलंका येथून प्रवास करुन भारतात परतली होती. या व्यक्तीवर व़डोदरातील एसएसजी रुग्णालयात कोरोना व्हायसरसंबंधित उपचार सुरु होते. या व्यक्तीसह त्याच्या परिवारातील 4 जणांना सुद्धा कोरोनाचे संक्रमण झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या 52 वर्षीय वृद्धाचा आज सकाळी मृत्यू झाल्याची माहिती वडोदरा जिल्हाधिकारी एस अगरवाल यांनी दिली आहे.(Coronavirus: मोदी सरकारच्या कोरोना व्हायरस पॅकेजवर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी काय म्हणाले?)

तर केंद्र आणि राज्य सरकारकडून अवाहन करण्यात येत आहे की, देशातील नागरिकांनी राज्याराज्यांमधे केले जाणारे स्थलांतरण टाळावे. देशातील विविध राज्यांतील नागरिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलेले असतात. त्यांनी आपापल्या राज्यात परतण्याची आवश्यकता नाही. संबंधित राज्यांनी त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग पाळण्याच्या निर्णयाला बाधा येईल असे काहीही करु नका असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.