कोरोना व्हायरसमुळे भारतातील बहुतांश लोक परदेशात अडकले आहेत. तसेच परदेशी विमानांनी त्यांच्या सीमा उड्डाणासाठी बंद सुद्धा केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर रविवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इराण आणि इटली येथे अडकलेल्या 450 भारतीयांना मायदेशी आणले आहे. यामध्ये 234 जण हे इराण आणि 218 जण हे इटली येथून आले आहेत. तर मोदी सरकारने या सर्व भारतीयांना मायदेशी आणले असून जगभरात जेथे कुठे भारतीय फसले आहेत त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
रविवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या 234 जणांमधील 131 जण विद्यार्थी आणि 103 जण भाविक आहेत. इराण येथून विमान दिल्ली येथे आल्यानंतर जैसलमेर येथे रवाना करण्यात आले. आर्मीच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सर्व जणांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून चाचणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी 44 प्रवाशांना इराण येथून भारतात आणण्यात आले. इराण मधून 58 प्रवाशांचा पहिला ग्रुप मंगळवारी भारतात आला. इराण येथे मृतांचा आकडा 700 च्या जवळ पोहचला आहे. देशात आतापर्यंत 13 हजार जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.(COVID-19: भारतात कोरोना च्या रुग्णांची संख्या 100 पार; नरेंद्र मोदी सरकारने खबरदारीसाठी अवलंबले 'हे' उपाय)
तर भारतातील विविध राज्यांमधून कोरोनाचे तब्बल 100 हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यांचीच संख्या 31 इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यात 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेजेस, सिनेमागृह, व एकूणच सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीएल सहित अनेक मोठमोठे कार्यक्रम सुद्धा या कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांवर विलगीकरण करून उपचार सुरु आहेतच तसेच संशयिताना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.