Doctors | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) नागरिकांना हादरून सोडले आहे. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची झाली आहे. यातच ठाणे (Thane) येथे एकाच दिवशी 10 डॉक्टरांची कोरोना चाचमी पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 190 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथे धारावी परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 18 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण 1 हजार 639 जणांना संसर्ग

ट्वीट-

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे अशीच परिस्थिती राहिल्यास पाचव्या लॉकडाउनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली आहे.