COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज 18 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 689 वर पोहोचली आहे. कोरोना प्रादर्भाव वाढू नये, म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे देखील वाचा- महाविकास आघाडी सरकारच्या टिकेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्त्यूत्तर

पीटीआयचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे.