Congress Protest: काँग्रेस आंदोलन; राहुल गांधी, Priyanka Gandhi Vadra पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्ते आक्रमक; काय घडलं आतापर्यंत?
Priyanka Gandhi | (Photo Credit - Twitter)

वाढती महागाई (Inflation) , बेरोजगारी (Unemployment) अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस (Congress) आज देशभरात आंदोलन (Congress Protest) करत आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. अवघा गांधी परिवारच आंदोलनात उतरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला आहे. भारतातील प्रमुख शहरांसह विविध राज्यांतील जिल्हा आणि तालुका स्तरावरही काँग्रेस मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे. दरम्यान, केंद्र सरकारला मात्र हे आंदोलन फारसे रुचले नाही. परिणामी, पोलीस प्रशासनाकरवी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारे सुरु आहे. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. तर काँग्रेसच्या इतरही नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे.

पोलिसांनी अडवला काँग्रेसचा मोर्चा

राजधानी दिल्ली येथे काँग्रेस नेते कार्यंकर्त्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह मोर्चा काढला. या मोर्चात शिर्ष नेतृत्वासह सर्व स्थरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस नेते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन देवू इच्छित होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी मध्येच मोर्चा आडवला. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा विजय चौक येथे आडवला. पोलिसांनी मोर्चा आडवताच मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेस खासदारांनी तिथेच ठिय्या मांडला. त्यानंर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'काय कराचं ते करा! आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही', राहुल गांधी आक्रमक)

काँग्रेस खासदार काळे कपडे घालून संसदेत

आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस खासदारांनी आज प्रतिकात्मक रुपात काळे कपडे वापरले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे खासदार काळे कपडे घालूनच कामकाजात सहभागी झाले. काँग्रेस खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले.

आंदोलनाची नियोजनबद्ध विभागणी

काँग्रेस पक्षाने एका प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे की, काँग्रेस कार्यकारी समिती (CWC) चे सदस्य आणि वरिष्ठ नेते पीएम हाऊसला घेरावो घालण्यात सहभागी होतील. जेणेकरुन लोकसभा आणि राज्यसभा खासदार 'चलो राष्ट्रपती भवन' आंदोलनात सहभागी होतील.

दिल्ली पोलिसांचा आंदोलनाला विरोध

दरम्यान, दिल्ली पोलीस प्रशासनाने काँग्रेसला आंदोलन करण्यास दिल्लीतील काही भागांमध्ये परवानगी नाकारली. संबंधित ठिकाणी प्रतिबंधांचा दाखला देत दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला संबंधित ठिकाणी आंदोलन करण्यास नकार दिला.

ट्विट

राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेतूनही हल्लाबोल

काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी संसदेत महागाई आणि बेरोजगारी विरोधात पक्षाच्या खासदारांच्या गटानेच नेतृत्व केले. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.