काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज निवडणूक (Congress Presidential Election) पार पडते आहे. पाठिमागील 24 वर्षांमध्ये कँग्रेस पक्ष ( Congress Party) अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे जवळपास दोन-अडीच दशकांनंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष पदावर निवडला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गुप्त मतपत्रिकेद्वारे इलेक्टोरल कॉलेजमधून 9,000 पेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदान करतील. हे प्रतिनिधी दर पाच वर्षांनी संस्थेतून निवडले जातात.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. भारत जोडो यात्रेसाठी कर्नाटकमध्ये एक विशेष बूथ तयार करण्यात आला आहे. ज्यात माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल. खरगे आणि थरूर हे दोन दावेदार कर्नाटक आणि केरळ या त्यांच्याशी संबंधित राज्यांमध्ये मतदान करणार आहेत. (हेही वाचा, Congress President Election: पक्षाची विचारधारा, तत्त्वे वाचवण्यासाठी मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे, Mallikarjun Kharge यांचे वक्तव्य)

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, सर्व राज्यांतील प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रांवर उपलब्ध मतपत्रिकांमध्ये त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठींबा देणाऱ्या उमेदवाराला 'टिक' चिन्ह देतील.मतदान सुरळीत मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Congress Presidential Election: काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक, राहुल गांधी कर्नाटक राज्यातून मतदान करण्याची शक्यता)

मतदान संपल्यानंतर, मतदानाच्या कुलीपबंद (सीलबंद) पेट्या दिल्लीला मंगळवारी

नेल्या जातील. मतमोजणीसाठी उघडण्यापूर्वी या पेट्या दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातील, असेही मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातील. ज्याला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील तो काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडला जाणार आहे.