दिल्ली: महाविकास आघाडी मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेस आमदार राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या भेटीला
Maharashtra Congress MLAs | Photo Credits: Twitter? ANI

महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल मुंबईमध्ये पार पडला. शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज कॉंग्रेस आमदार दिल्लीला पोहचले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेऊन आज महाराष्ट्राचे आमदार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये बैठक होणार आहे. दरम्यान बैठकीपूर्वी कॉंग्रेस आमदारांनी राहुल गांधी यांच्यासोबत खास फोटोसेशन केलं आहे. यामध्ये महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी मलिक्कार्जुन खर्गे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये काल कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण यांच्यासह 10 आमदारांचा समावेश झाला आहे. Maharashtra Cabinet Expansion: आदित्य ठाकरे ते अमित देशमुख; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट विस्तारामध्ये 'अशी' दिसली घराणेशाही.

कॉंग्रेस आमदारांचे राहुल गांधींसोबत फोटोसेशन

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला असला तरीही अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. येत्या 1-2 दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर केले जाईल अशी माहिती काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मीडीयाशी बोलताना दिली आहे.