देशातील सर्वात जुना आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress ) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी (CWC) बैठक येत्या 16 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे. पक्षाने आज (9 ऑक्टोबर) दुपारी याबाबत घोषणा केली. या बैठकीत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा होऊ शकते. काँग्रेसने माहिती देताना म्हटले आहे की, काँग्रेस कायकारणीची बैठक 16 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता पार पडेल. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत ट्विट केले आहे की, या बैठकीत विद्यमान राजकीय स्थिती तसे आगामी विधानसभा निवडणुका, आणि पक्षाचे संघटन याबाबत चर्चा होईल.
पाठीमागील काही दिवसांपासून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजात आणि कपील सिब्बल यांनी सीडब्ल्यूसी बैठकीची मागणी केली होती. आजाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आग्रह केला होता की, पक्षाशी संबंधीत प्रकरणांवर काँग्रेस कार्यसमितीची एक बैठक बोलावली जावी. (हेही वाचा, Congress Star Campaigners: कन्हैया कुमार, नवजोत सिंह सिद्दू यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर)
सिब्बल यांनी पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गरमागर्मीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, काँग्रे सार्य समितीची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली जावी. तसेच, संघटनांतर्गत निवडणूक पार पडावी असेही म्हटले आहे. आझाद आणि सिब्बल यांच्यासह 23 प्रमुख नेत्यांनी (ग्रुप-23) पाठीमागील वर्षी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहीले होते. या पत्रात पक्षात संघटनात्मक निवडणुका घ्यावात असे म्हटले होते. या ग्रुपमधील प्रमुख नेते जितिन प्रसाद आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.