सप्टेंबर महिन्याची सुरूवात सामान्यांसाठी आनंदवार्तांनी झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज एलपीजी च्या कमर्शिअल सिलेंडर्स किंमतींमध्ये (Commercial LPG Cylinder Prices) घट झाली आहे. सोबतच तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला तरी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता कायम आहे. आज एलपीजी सिलेंडर्सच्या किंमती मध्ये 91.50 रूपयांनी घट नोंदवण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्ली (Delhi) मध्ये 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडर साठी 1885 रूपये तर मुंबई (Mumbai) मध्ये 1844 रूपये मोजावे लागणार आहेत.
आज पासून लागू होणार्या नव्या दरांमध्ये दिल्लीत पूर्वी 1976 मोजावे लागणारा सिलेंडर 1885 रुपयांना उपलब्ध होणार आहे. मुंबई मध्येही 1936.50 चा सिलेंडर आता 1844 रूपयांना मिळणार आहे. चैन्नई मध्ये 2141 रूपयांचा सिलेंडर 2045 रूपयांना मिळणार आहे. कोलकाता मध्ये 2095.50 रूपयांना मिळणारा सिलेंडर 1995.50 रूपयांना उपलब्ध होणार आहे.
हा सलग पाचवा महिना आहे ज्यावेळेस कमर्शिअल सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.
19 मे 2022 दिवशी उच्चांकी किंमतीवर पोहचलेला गॅस सिलेंडर 2354 रूपयांना मिळत होता. नंतर हळूहळू त्यामध्ये घट नोंदवण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: LPG Cylinder घेताना वितरक निवडण्याची ग्राहकांना मुभा; या '5' शहरांत सुरु होणार सुविधा .
काही दिवसांपूर्वी सरकार कडून सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी उज्ज्वला योजना अंतर्गत 200 रूपये प्रति सिलेंडरची घोषणा झाली आहे. ही सबसिडी 12 सिलेंडर्स साठी मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे 9 कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा मिळणार आहे.