पश्चिम बंगाल: नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरुद्ध आंदोलन पेटले; मुर्शिदाबाद येथे 5 एक्सप्रेस ट्रेन जाळत नोंदवला निषेध (Watch Video)
CAB Protesters Sets Train On Fire (Photo Credits: Twitter)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) विरुद्ध देशभरातून अनेक ठिकाणी तीव्र आंदोलने केली जात आहेत, मात्र पश्चिम बंगाल (West Bengal) येथे या आंदोलनांनी चांगलाच जोर धरला आहे. दुरुस्ती कायद्याची घोषणा होऊन अवघे 24 तास ही उलटले नाहीत तोवर काल, (14 डिसेंबर) रोजी काही आंदोलनकर्त्यांनी मुर्शिदाबाद (Murshidabad) येथे कृष्णपूर (Krushnapur) स्थानकात चक्क 5 एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिल्याचे समजत आहे. सध्या या घटनेच्या काही व्हिडीओ क्लिप्स (Video Clips) सोशल मीडियावर शेअर केल्या जात असून यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी असा मार्ग योग्य नाही असे म्हणत काहींनी या विरुद्ध प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी या कृत्याचे समर्थन देखील केल्याचे दिसत आहे.

Citizenship Amendment Bill केंद्रीय मंत्रिमंंडळात मंजूर पण राज्यसभेत सरकारची कसोटी पाहणारं नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक नेमकंं आहे काय?

पहा व्हिडीओ

Citizenship Amendment Act: नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरुद्ध असदुद्दीन ओवैसी यांची सुप्रीम कोर्टात धाव; वकील निझाम पाशा यांची माहिती

यापूर्वी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनकर्त्यांना कायदा विरोधी हिंसक कृत्य न करण्याचे आवाहन केले होते. काहीही झाले तरीही बंगाल मध्ये CAB-NRC लागू होऊ देणार नाही असे आश्वासन देखील ममता यांनी दिले होते.

मात्र ममता यांच्या या भूमिकेवर भाजप नेते राहुल सिन्हा यांनी नाराजी व्यक्त करत ममता आणि TMC यांच्या वागणुकीमुळे बंगालमध्ये हिंसा वाढत आहे, हे न थांबल्यास राष्ट्रपती राजवट सोडल्यास सरकार चालवण्याचा मार्ग उरणार नाही . त्यामुळॆ हा प्रकार लवकर थांबवण्यासाठी हिंसक आंदोलकांना जागीच मारून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री म्ह्णून ममता यांनी द्यावेत असेही सिन्हा यांनी सांगितले आहे.