वायुदलाची क्षमता वाढवणारी चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून वायुसेनेत दाखल
Chinook Helicopters (Photo Credits: Twitter, @Boeing_In)

भारतीय वायुदलाची क्षमता अधिक वाढवणारे चिनुक हेलिकॉप्टर आज वायुदलात दाखल होतील. यासाठी वायुदलाकडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वायुदलाची ताकद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने 2015 मध्ये केवळ 15 चिनुक हेलिकॉप्टर्सची ऑर्डर अमेरिकन कंपनी बोईंगला दिली होती. ती हेलिकॉप्टर्स 4 फेब्रुवारीला भारतात दाखल झाली. चंडीगडमध्ये एअर ची मार्शल बीएस धनोआ (Birender Singh Dhanoa) यांनी चार अधिक कार्यक्षम चिनुक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुदलाला सुपूर्त केली.

CH-47 चिनुक अॅडव्हास्ड मल्टी मिशन हेलीकॉप्टर आहेत. यामुळे सैनेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.

चिनुक हेलिकॉप्टर्सची वैशिष्ट्ये:

# चिनुक हेलिकॉप्टर्स पूर्णपणे इंटीग्रेटेड, डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टम, कॉमन एव्हिएशन आर्किटेक्चर कॉकपिट आणि अडवान्स्ड कार्गो हॅडलिंग या सुविधांनी सुसज्ज आहेत.

# 11 हजार किलो पर्यंत हत्यार आणि सैनिकांचे वजन चिनुक हेलिकॉप्टर्स अतिशय सहज उचलू शकतात.

# चिनुक हेलिकॉप्टर्स अमेरिकी सेनेशिवाय अन्य देशात सक्रीयपणे कार्यरत आहेत. व्हेयतनाम युद्ध, लिबीया, इराण, अफगाणिस्तान, इराक मध्ये हे हेलिकॉप्टर्स महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका निभावत आहेत.

हिमालयासारख्या उंच ठिकाणी हे हेलिकॉप्टर्स अतिशय उपयुक्त ठरतील. हे हेलिकॉप्टर्स छोटे हेलिपॅड्सवर लॅंड होऊ शकतात. प्रतिकुल वातावरणातही हे हेलिकॉप्टर्स उड्डाणासाठी कार्यक्षम असतील. याचा स्पीड 315 किमी प्रती तास इतका असेल. चिनुक हेलिकॉप्टर्स देशभरात 19 देशात वापरले जातात. अमेरिकन वायुसेना याचा वापर 1962 पासून करत आहे. कंपनीने आतापर्यंत एकूण 1179 चिनुक हेलिकॉप्टर्स बनवले आहेत.