भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah) यांनी आज (20 फेब्रुवारी 2020) भारत-चीन सीमेवर असलेल्या पूर्व प्रदेशात जाऊन अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस कार्यक्रमात सहभाग नोंदवला. शाह यांच्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेत नाराजी नोंदवली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा दक्षिणी तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा करत चीनने अमित शाह (Amit Shah) यांच्या या दौऱ्यास विरोध केला आहे. तसेच, शाह यांचा हा दौरा म्हणजे प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
भारतीय सरकारमधील कोणत्याही अधिकृत व्यक्तीने अरुणाचल प्रदेश परिसराला भेट दिली तर चीन नेहमीच त्याचा विरोध करत आला आहे. तसेच, हा प्रदेश आपल्या हद्दीत असल्याचे नकाशात दाखवण्याचे अनधिकृत कृत्यही चीन अनेकदा करतो. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी गुरुवारी म्हटले की, भारत चीन समेवरील पूर्व प्रदेशात चीनची स्थिकी किंवा चीनच्या तिबेट क्षेत्राचा दक्षिणी प्रदेशाती स्थिती स्पष्ट आहे. चीनच्या तिबेट प्रदेशातील दक्षिण भागात भारतीय नेत्यांनी दौरा करणे हे प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. या दौऱ्यामुळे भारत-चीन सीमावादात निवळत असलेले अंतर अधिक वाढविण्याचे काम झाले आहे. (हेही वाचा, जम्मू-कश्मीर साठी आपले प्राणसुद्धा देऊ- गृहमंत्री अमित शाह)
भारत-चीन सीमा वादा तब्बल 3,488 किलोमीटर इतक्या लांबीची वास्तविक नियंत्रण रेषा (LOC) अंतर्भूत करतो. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिणी तिबेटचा हिस्सा मानतो. जो भारताचे अभिन्न अंग असून, चीनच्या या धोरणाचा भारत नेहमीच खंडण करत आला आहे. भारत-चीन यांच्यातील सीमा वाद सोडविण्यासाठी आतापर्यंद उभय देशांचे प्रथिनिधी मंडळ 22 वेळा एकमेकांना भेटले आहेत. 20 फेब्रुवारी हा अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस आहे. या दिवशीच हा प्रदेश केंद्र शासित प्रदेश करण्यात आला होता.