Chhattisgarh: रायपुर मध्ये CRPF च्या तुकडीला घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट, 4 जवान जखमी
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Chhattisgarh: छत्तीसगढची राजधानी रायपुरच्या रेल्वे स्थानावर उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले आहेत. सकाळी 6 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर हा स्फोट झाला आहे. या मध्ये एक जवान सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रायपुर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Chhattisgarh Shocker: दुर्गा विसर्जनासाठी जाणाऱ्या लोकांना वेगवान कारने चिरडले; पहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रायपुर रेल्वे स्थानकातून 221 वी बटालियनचे जवान स्पेशल ट्रेनने जात होते. रायपुर रेल्वे पीआरओ शिव प्रसाद यांनी स्फोटाची पुष्टी केली आहे. डमी काडतूस बॉक्समध्ये ठेवली होती. समान ट्रेनच्या बोगीमध्ये ठेवताना फुटले, ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने बटालियनचे जवान होते. याच दरम्यान बाथरुम जवळ ठेवलेला डेटोनेटर फुटला. यामध्ये सहा जण जखमी झाले. स्फोटामुळे खळबळ उडाली. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अन्य जवानांना घेऊन ट्रेन पुढे रवाना झाली.

Tweet:

प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफचे जवान चव्हाण विकास लक्ष्मण, रमेश लाल, रवींद्र कर, सुशील आणि दिनेश कुमार पाईकरा हे ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात जखमी झाले आहेत. त्यापैकी एक विकास हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी श्री नारायण हॉस्पिटल देवेंद्र नगर येथे दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की उर्वरित जखमींना प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी जखमी जवानाचे जबाब नोंदवले आहेत. या घटनेचाही तपास सुरू आहे. कोणत्या परिस्थितीत डिटोनेटरचा स्फोट झाला हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफचे उच्च अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.