छत्तीसगढ: एका महिलेने दिला 6 बालकांना जन्म, राज्यातील पहिलीच घटना
(Photo credit: archived, edited, symbolic images)

एका महिलेने तब्बल 6 बालकांना एकाच वेळी एकापाठोपाठ एक असा जन्म दिला. छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्यातील चांपा (champa) जिल्ह्यात ही घटना गुरुवारी घडली. एका गर्भवती महिलेला पोटदुखीमुळे तीव्र वेदाना होऊ लागल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान महिलेने बालकांना जन्म दिला. मात्र, पूर्ण मुदतीपूर्वी या बालकांनी जन्म घेतल्याने ही सर्व बालके मृतावस्थेतच जन्माला आली.

प्राप्त माहितीनुसार, या सहा बालकांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव गंगा चंद्रा (25 वर्ष) असे आहे. ती चंपा जिल्ह्यातील नंदेली राहणारी आहे. गंगा चंद्रा हिला बाळंतकळा (लेबर पेन) जाणवू लागल्या. नातेवाईकांनी तिला जैजैपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे तिने 6 बालकांना जन्म दिला. एकूण सहा बालकांपैकी दोन बालकांची शरीरे जन्मताच एकमेकांना जोडलेली होती. डॉक्टरांनी म्हटले आहे की, छत्तीसगढमधील ही पहिलीच घटना आहे. या घटनेत बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, बाळंतपणानंतर महिलेचे प्रकृती सामान्य आहे.

डॉ. श्याम लाल बंजारे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहीतीनुसार, अवघ्या चारच महिन्यात महिलेने बालकांना जन्म दिल्यामुळे ही सर्व अर्भके अविकसित होती. त्यामुळे या बालकांचे प्राण डॉक्टर वाचवू शकले नाहीत. प्रचंड मोठ्या प्रामाणावर पोटदुखी सुरु झाल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्या तिचा गर्भपात झाला. (हेही वाचा, आश्चर्यम: महिलेने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे दिला तब्बल 7 मुलांना जन्म; बाळ-बाळंतीण सुखरूप)

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, गंगा चंद्रा या महिलेला रुग्णलयात बुधवारी रात्री दाखल केले. गुरुवारी सकाळी तिला प्रसववेदना सुरु झाल्या. ज्यात या महिलेने 6 अविकसित अर्भकांना जन्म दिला. त्रास होण्या पूर्वीच जर या महिलेची सोनेग्राफी केली असती तर, कदाचीत या बालकांचे प्राण वाचू शकले असते. ही महिला गावातच प्राथमिक उपचारांसोबत औषधे घेत होती. महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की या महिलेची ही पहिलीच प्रसुती होती. या घटनेमुळे महिलेसोबत तिचे कुटुंबीही दु:खी आहेत.