माहिती व प्रसारण मंत्रालयाने (Information & Broadcasting Ministry)जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, सर्व प्रसारमाध्यमांशिवाय सोशल मिडियावर देखील आता मंत्रालयाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर टाकणा-यांवर कडक कारवाई होणार आहे. असे असताना देखील 'चेन्नई टॉक्स' (Chennai Talks) युट्यूब चॅनेलने अशा पद्धतीचा मजकूर असलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. इंडिया टुडे ने दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये एक महिला सेक्स आणि मद्यपानावर माहिती देताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या युट्यूब चॅनेलच्या 3 युट्यूबर्सला (YouTubers) अटक केली आहे.
या व्हिडिओमध्ये 23 वर्षाचा एक व्हिजे सार्वजनिक ठिकाणी एक महिलेला सेक्स आणि मद्यपानाविषयी प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याचे उत्तर ती महिला देताना दिसत आहे. या व्हिडिओतील त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.हेदेखील वाचा- Gang Rape In Aurangabad: वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
तिने पोलिसांना अशी माहितीही दिली की त्यांनी जेव्हा त्या कॅमेरामन आणि व्हिजेला अडवले तेव्हा त्यांनी तिला धुडकावून दिले. शिवाय त्यांनी तिला असे आश्वासन दिले होते जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला जाईल तेव्हा त्याखालील कमेंट सेक्शन हटवले जाईल. मात्र तसे झाले नाही. व्हिडिओ व्हायरल होऊन लोकांना याखाली अश्लील कमेंट द्यायला सुरुवात केली.
हे बघितल्यानंतर त्या पीडित महिलेने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चेन्नई टॉक्सच्या 3 युटयूबर्सला अटक करुन त्यांच्याकडील मायक्रोफोन, कॅमेरा आणि 4 स्मार्टफोन देखील ताब्यात घेतले.
त्याचबरोबर या महिलेने आपल्या तक्रारीत धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. ती म्हणाली जेव्हा हा व्हिडिओ करण्यासाठी त्या युट्यूबर्सने तिला 1500 रुपये दिले होते. त्याशिवाय स्क्रिप्टही तयार करुन दिली होती ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होईल.