Gang Rape In Aurangabad: वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Rape | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

Gang Rape In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. रविवारी रात्री औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (Gang Rape In Jalgaon: सामूहिक बलात्कार पीडित युवतीला पाजले विष, उपचारादरम्यान मृत्यू; जळगाव येथील थरारक घटना)

प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादमध्ये आली होती. परंतु, ही तरुणी रस्ता चुकली. या मुलीला एकटं पाहून अज्ञातांनी तिला रेल्वे स्थानक परिसरात एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Minor Girl Gang Rape Case: नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांना अटक)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अटक करत आरोपींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलीला नराधमांनी चाकूचा धाक दाखवून त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

राज्यात विविध जिल्ह्यात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या देशावर कोरोना विषाणूचं संकट असताना या सर्व गुन्हेगारी घटनांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मेट्रो सिटीमध्ये बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.