![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/10/rape.jpg?width=380&height=214)
Chennai Shocker: चेन्नईच्या इंजांबक्कम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 40 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापिकेला 22 वर्षीय महिला शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, मुख्याध्यापिकेने आगामी सहामाही परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षिकेला घरी बोलावले होते. यावेळी मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला शीतपेय दिल्याने ती बेशुद्ध झाल्याचा आरोप आहे. जेव्हा शिक्षिकेला शुद्धी आली तेव्हा तिने स्वतःला अर्धनग्न अवस्थेत पहिले आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. TOI च्या रिपोर्टनुसार, नाराज झालेल्या शिक्षिकेने थिरुवनमियुर महिला पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा: Paytm कडून Diwali 2024 निमित्त खास Festive QR Code (See Pic)
मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर मुख्याध्यापिकेची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्यावर गैर-गंभीर कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
महिला आणि मुले हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला - 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.