प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

चेन्नई (Chennai) येथील काही विद्यार्थी 'बस डे' (Bus Day) साजरा करत होते. त्यावेळी कॉलजचे विद्यार्थी बसच्या टपावर बसून मजामस्ती करताना दिसून आले. तसेच काही विद्यार्थी बसच्या खिडकीला सुद्धा लटकलेले होते. मात्र अचानक बसचा ब्रेक लावल्यावर काही विद्यार्थी काही पडून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

व्हिडिओतील विद्यार्थी बसच्या टपावर बसून घोषणाबाजी करत होते. तसेच काही विद्यार्थी बसच्या खिडकीवर लटकत सेलिब्रेशन करत होते. परंतु एक बाईक समोरुन आल्याने बसचा ब्रेक लागताच काही विद्यार्थी थेट टपावरुन खाली पडले.

(लग्नात पाणीपुरी खाण्यावरून व-हाड्यांमध्ये जुंपली, हाणामारीत एकाचा मृत्यू)

या प्रकारात काही विद्यार्थ्यांना जबरदस्त मार लागला आहे. तर पोलिसांकडून विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीच्या सेलिब्रेशनवर आक्षेप घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा इशारा दिला आहे. त्याचसोबत 24 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.