New Delhi: केंद्र सरकारने कोणत्याही सर्कच्या (Circus) कार्यक्रमामध्ये प्राण्यांचे खेळ सादर करण्यावर बंदी आणली आहे. तसेच प्राण्यांचा सर्कच्या खेळासाठी वापर करणे अयोग्य असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
पर्यावरण मंत्रालयाने 28 नोव्हेंबर रोजी प्राणी आणि पक्ष्यांसाठी तयार केलेल्या कराराध्ये पक्षुप्रेमींकडून या निर्णयावर 30 दिवसांच्या आत त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सांगितले आहे. त्यामुळे पशुप्रेमींना केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या करारामध्ये Performing Animals Rule 2001 च्या नियम 13 मध्ये 13A हा नवीन नियम लागू केला आहे. तसेच या नियमाचा उपयोग प्राण्यांना ट्रेनिंग देणे किंवा त्यांचा प्रदर्शनात वापर करणे यावर बंदी घालण्यासाठी असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या निर्णयावर अंमलबजावणी होणार असून कोणत्याही कार्यक्रमात किंवा सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ दाखविण्यास बंदी आणली जाणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर पिपल फॉर अॅनिमल्स ट्रस्टच्या (People For Animal Trust) अध्यक्षा गौरी मौलेखी यांनी सरकारची प्रशंसा केली आहे.