Census 2021: यंदाची 2021 रोजी होणारी जनगणना ही आजच्या डिजिटल युगात पेपर आणि पेन शिवाय होणार असून एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) आणि जनगणना आयुक्त एका मोबाईल अॅपवर काम करत आहे जेणेकरुन मोजणी संबंधित सर्व माहिती या अॅपद्वारे कॅप्चर करु शकणार आहेत. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांच्या मते, हा डेटा सोप्या आणि सहजरित्या जमा करण्याचा उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पेपरवरील डेटा एकत्र करुन नंतर संगणाद्वारे त्याची पुन्हा माहिती देण्याचे कष्ट वाचणार आहेत.
भारताची जनगणना 140 वर्षात पहिल्यांदाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे जनगणना मोजणाऱ्या व्यक्तींना त्यांचा स्मार्टफोन वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून आकडेवारी रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना पैसेसुद्धा नंतर दिले जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेपरच्या माध्यमातून केली जाणारी जनगणना कायम राहणार आहेच. पण इलेक्ट्रॉनिक आधारावर एन्यूमरेटर्स (Enumerators) यांना ही जनगणना दाखवावी लागणार आहे.
त्यामुळे जनगणनेची आकडेवारी एकत्र करणाऱ्या लोकांना कागदावरील जनगणनेची माहिती एकत्र करण्याचे काम हलके होणार आहे. तसेच डेटा इलेक्ट्रॉनिक रुपात दाखल करण्यात येणार असून त्याचे जिल्हा, राज्य या पद्धतींमध्ये विभागला जाणार आहे.