बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! 'या' बँकेचे IFSC कोड बदलणार असल्याने लवकरच उरका कामे
Representational Image Photo Credit: PTI)

Canara Bank/Syndicate Bank IFSC Code Changing: कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना एक महत्वाची सुचना दिली आहे. त्यानुसार येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचे सर्व आयएफएससी कोड डिसेबल असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना येत्या 30 जून पर्यंत आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आपला आयएफएससी कोड अपडेट करावा असे सांगण्यात आले आहे.(PNB खातेधारकांनी 30 जून पर्यंत उरकून घ्या 'हे' जरुरी काम अन्यथा होईल मोठी समस्या)

कॅनरा बँकेने असे म्हटले की, अशी सुचना दिली जात आहे की कॅनेरा बँकेसह सिंडिकेट बँकेचे विलिकरण झाल्यानंतर SYNB पासून सुरु होणारे सर्व ई-सिंडिकेट आयएफएससी कोड बदलले जाणार आहेत. SYNB पासुन सुरु होणारे सर्व IFSC कोड येत्या 1 जुलै पासून डिसेबल होणार आहेत.(Medical Robot: पटना येथील इंजिनियरींगच्या विद्यार्थीनीने तयार केला रोबोट; कोरोना रुग्णांच्या सेवेत करणार डॉक्टरांची मदत) 

Tweet:

बँकेने आपल्या वेबसाइटवर एक संदेश जाहीर केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की तुमच्या सर्व सेंडर्सला NEFT/RTGS/IMPS पाठवताना CRNB पासून सुरु होणारा नवा आयएफएससी कोडचा वापर करावा.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑगस्ट 2019 मध्ये कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे विलिकरण करण्याचे घोषित केले होते. त्यानंतर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक मिळून देशातील सर्वाधिक मोठी चौथी बँक ठरली आहे.सरकारद्वारे या विलिगिकरणामुळे एकूण उद्योग 15.20 लाख कोटी रुपये होणार असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे.