Calcutta High Court:  अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणणे पडू शकते  महागात, जाणून घ्या कोलकाता  हायकोर्टाचा निर्णय
कोर्ट । ANI

अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणणे आता महागात पडू शकते. एखाद्या महिलेला डार्लिंग म्हटल्यास आरोपी हा लैंगिक छळाचा गुन्हा हा मानला जाऊ शकतो. या आरोपीला भारतीय दंड सहिता कलम 354 ए अतंर्गत तुरुंगवारी होऊ शकते. याचप्रकारचा निकाल कोलकाता हायकोर्टात देण्यात आला आहे. पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी हा निकाल दिला आहे. (हेही वाचा -Sandeshkhali Case: शेख शाहजहान यांना अटक करा; संदेशखाली प्रकरणात कोलकाता हायकोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारला निर्देश)

या प्रकरणी आरोपी जनकची शिक्षा कायम ठेवली. कारण आरोपीने नशेत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की, 'काय डार्लिंग? चलान कापायला आली आहे का?'. असं म्हटल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली. या प्रकरणी सेनगुप्ता यांनी म्हटलं की, '354 ए उल्लेख करत म्हटलं की, आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. रस्तावरील अनोळखी महिला असो किंवा महिला पोलीस अधिकारी... एखादा व्यक्ती त्यांना डार्लिंग बोलू शकत नाही'.

हायकोर्टाने म्हटलं की,' आरोपीने शुद्धीत असतानाही महिला अधिकाऱ्यावर टिप्पणी केली असती, तरी गंभीर गुन्हा मानला गेला असता'. 'रस्त्यावर जाणाऱ्या अनोळखी महिलेला डार्लिंग बोलणे आक्षेपार्ह बाब आहे. दरम्यान, लैंगिक छळ गुन्हा केल्या प्रकरणी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच या प्रकरणात आरोपीला दोन्ही शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.