
कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) चे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ (V.G.Siddhartha) यांच्या निधनामुळे संपुर्ण कॅफे कॉफी डे परिवार शोकसागरात बुडाला असून त्यांच्या निधनामुळे आज देशभरातील सर्व सीसीडी आउटलेट्स बंद राहणार आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ यांनी मंगळूरु (Mangaluru) च्या नेत्रावती नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मृतदेहआज सकाळी मंगळूरू पोलिसांना सापडला. मृत्यूपुर्वी सिद्धार्थ यांनी लिहिलेल्या पत्रात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छळ झाल्याचा तसेच, कर्जदारांकडून असह्य दबाव असल्याचे म्हटले आहे.
संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेले कॅफे कॉफी डे चे संस्थापक व्ही.जी.सिद्धार्थ हे 29 ऑगस्टपासून घरातून बेपत्ता झाले होते. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी शोधण्यासाठी सुरु असलेली शोध मोहीम आज त्यांचा मृतदेह हाती लागताच थांबली. मंगळुरूतील (Mangaluru) होजी बाजाराजवळ नेत्रावती नदीच्या पात्रात सकाळी 6.30 च्या सुमाराला कोणाचा तरी मृतदेह तरंगत असल्याची माहिती मंगळुरू पोलिसांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर तो मृतदेह व्ही.जी. सिद्धार्थ यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा- कर्नाटक: कॅफे कॉफी डे चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नेत्रावती नदीत सापडला मृतदेह
त्यांच्या निधनामुळे 240 शहरांमधील 1750 रिटेल आउटलेट आज बंद राहणार आहेत. तसेच Coffee Global Enterprises आणि Amalgamated Bean Coffee सहित सीसीडीचे कार्यालय सुद्धा आज देशभरात बंद राहतील.
सिद्धार्थ यांच्या मृत्यूमुळे दक्षिणा राज्यात 3 कॉफी जिल्ह्यांत चिक्कमगलुरु, हासन आणि कोडुगू मध्ये सर्व कॉफी क्षेत्रातील कामगारांना आणि मजूरांना 1 दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले एस. एम. कृष्णा (S.M.Krishna) यांचे जावई आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोटेपुरा परिसरात नेत्रावती नदीवरील एका पुलाच्या परिसरात सिद्धार्थ अखेरचे दिसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.