Maharashtra: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) येथे एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक कर्ज मंजूर न झाल्याने टोकाचे पाऊल उचलू असा इशारा दिला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्याने शिक्षणाचे कर्ज मान्य न झाल्याने आत्महत्या करीन किंवा उत्तम नक्षलवादी बनवून दाखवीन असे म्हटले आहे. तर वैभवअसे मुलाचे नाव असून त्याच्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु ते फेडले न गेल्याने आता वैभव याला शिक्षणासाठी धडपड करत आहे. परंतु त्याला शिक्षणासाठी बँकेने कर्ज नाकारल्याने तो आता निराश झाला असून त्याने पत्रात बोगस सिस्टिमचे माझ्या पद्धतीने कंबरडे मोडेन असे ही त्याने पत्रात म्हटले आहे.(औरंगाबाद: कर्ज फेडण्यासाठी पेट्रोल चोरी; दोन तरुण गजाआड)
वैभव याने फार्मसी मध्ये शिक्षण घेत आहे. तर पहिल्या वर्षाला त्याला उत्तम गुण मिळाले. परंतु दुसऱ्या वर्षासाठी पैसे भरायचे होते. पण शेतात पिक पीकलेच नाही. त्यामुळे त्याच्या शिक्षणावर गदा आली असून ते आता थांबण्याची वेळ आली आहे. वैभव याने शिक्षणासाठी कर्ज मिळावे म्हणून बँकेकडे अर्ज केला होता. परंतु बँकने त्याला वडिलांचे शेतीचे कर्ज फिटले नाही म्हणून आता शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार नाही असे म्हटले.(Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020: १० वी, १२ वी च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असे पहा तुमचे गुण)
तर बँकेने त्याच्या शिक्षणासाठी कर्ज मंजूर न झाल्याचे सांगण्यासाठी जवळजवळ चार महिने लावले. तो पर्यंत वैभव वेळोवेळी बँकेचे खेपा घालतच होता. मात्र कर्ज नामंजूर झाल्याचे कळताच त्याने नाराजी व्यक्त केली. तसेच या चार महिन्यात दुसऱ्या बँकेत कर्जासाठी अर्ज केला असता असे ही त्याने बोलून दाखवले आहे. तर आता मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर काय उत्तर दिले जाते याची प्रतिक्षा आता वैभव करत आहे.