मोदी सरकार 2.0 चं आज शेवटचं संपूर्ण बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलं आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचं हे पाचवं बजेट होतं. सर्वसामान्य शेतकरी ते नोकरदार वर्ग यांना या अर्थसंकल्पाकडून बर्याच आशा होत्या. 2024 च्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वी मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये अनेक लोकप्रिय घोषणा होतील अशी आशा नागरिकांना होती. त्यानुसार सकाळी 11 वाजता निर्मला सीतरमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पहा नेमकं काय झालं स्वस्त आणि काय महागलं?
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पामध्ये मध्ये सूट देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. काल आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर6 % च्या आसपास असेल असा अंदाज मांडण्यात आला होता.
पहा नेमकं काय स्वस्त आणि काय महागलं?
काय स्वस्त झाले?
एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रीक वाहने, बायोगॅसशीसंबंधीत वस्तू, लिथियम सेल्स, सायकल
काय महागले
सिगारेट, मद्य, छत्री, विदेशी किचन चिमनी, सोने, आयात केलेले चांदिचे सामान, प्लेटिनम, एक्स-रे मशीन, हिरे
Clothes, cigarettes, imported rubber set to become more expensive. #UnionBudget #UnionBudget2023
— THE WEEK (@TheWeekLive) February 1, 2023