भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Union Finance Minister Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) आज केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता लोकसभेत त्या अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात करतील. काळानुरूप अर्थसंकल्प सादर करण्याच्या रीती-परंपरा बदलल्या आहेत. 'Bahi Khata'ऐवजी यंदा अर्थसंकल्प टॅब वर वाचला जाणार आहे. सलग दुसऱ्यांदा संसदेत कागदविरहित अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प वाचनापूर्वी त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला प्रोटोकॉलनुसार पोहचल्या आहेत.
यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आयोजन 2 टप्प्यांत करण्यात आलं आहे. त्याचा पहिला टप्पा काल 31 जानेवारीपासून सुरू झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला. चालू आर्थिक वर्षासाठी 9.2 टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला असून पुढील आर्थिक वर्षात तो 8 ते 8.5 टक्के राहील, असा अंदाज या अहवालामध्ये मांडण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Budget 2022 Live Streaming: आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण.
Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from the Ministry of Finance.
She will present and read out the #Budget2022 at the Parliament through a tab, instead of the traditional 'bahi khata'. pic.twitter.com/Z3xgSvTXtW
— ANI (@ANI) February 1, 2022
राष्ट्रपतींसोबत भेट
Union Finance Minister Nirmala Sitharaman along with Ministers of State for Finance, Dr Bhagwat Kishanrao Karad, Shri Pankaj Chaudhary, and senior officials of the Ministry of Finance, called on President Ram Nath Kovind before presenting the Union Budget 2022-23. pic.twitter.com/7JNZt3rOPj
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थमंत्री संसदेत दाखल
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament. She will present the #UnionBudget2022 today. pic.twitter.com/MQoxC388TZ
— ANI (@ANI) February 1, 2022
सध्याच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र 3.9% वाढेल, असा अंदाज व्यक्त आहे. त्याशिवाय औद्योगिक क्षेत्राचा 11.8 टक्के वृद्धीदर राहील,असा अंदाज आहे. सेवा क्षेत्राचा 8.2% दराने विकास होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज पाच तास चालणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणार आहे.